अंगुठ्याची लोकशाही

सरंजामी व्यवस्थेत सदा दुःखाचा पहाडा, त्यात भर वसाहतीतल्या आधुनिकतेची
सरंजामी वसाहतवाद फोफावल्याच्या काळात, बऱ्याच घटनेने अपरिणीत परिणाम केलेत
आज जशी ती लोकशाही अपेक्षित होती, ती नाहीच.
विशिष्ट भांडवली संगठन, असे बरेच संगठन समूहाने;
चिखलफेक करीत, नाना प्रकारचे गुलाम तयार केलेत.
गुलामाला, व
साहतवाद संपल्याचा आनंद पण न होऊ देता मोठ्या मनाचे उदारमतवाद्यांनी
जातीय-वर्गीय संसाधनेकृत हा भू-प्रभाग पण वसाहतवाद्याच्या
बोभाट जाळ्यात अडकवला.
कारण
वसाहतवाद अलोभने, प्रलोभने सोबतच घेऊन आलेला
आधुनिकता पण जशीच्या तशी न स्वीकारता, तिला ढिगळे* लावलीत.
शोषितांना शिक्षणाची गरज, गरज ओळखणाऱ्याला पुढच्या असंख्य पिढ्यांना guide करायचंय म्हणून
बरेच शिल्पे कोरून ठेवली अन वाटचाल पुढे ठेवा म्हणाला
त्या शिल्पकाराला ती अंगुठ्याची लोकशाही पण पुढे आणू नाही दिली उदारमतवाद्यांनी.
संसद ग्वाही देतं, त्या विरोधाला.
ढाहि ढाहि कोसळला, म्हणाला हि शिल्पकला जर गुलामाला नाही देत मार्ग तर मी स्वतः जाळीन.
शिल्पकार म्हटला, हि लोकशाही तेव्हाच बरीच जेव्हा हिला चालवणारे बरे
आज जे काही दिसतंय, ते बरे चालक नाहीत लोकशाहीचे म्हणून.
कुत्र्या-घोड्यांवानी भाव
आणि दुरापास्त अवस्था
अंगुठ्याची लोकशाही – झुकली
उदारमतवाद्यांना थोडे शिक्षित गुलाम पाहिजे होते, मध्यंतरी म्हणून.
मध्यम वर्ग चळवळ जपली, जपवली गेली.
अंगुठ्याची लोकशाही पण चालेल
जेव्हा अंगुठावाला वाचेल – विचार करेल.

*ढिगळे म्हणजे काय विचारू नये, मग मज्जा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *