अरिष्ट

जातीय-वर्गीय अरिष्टांना ती तोंड देत, शहराकडे वळली. गावाकडच्या त्रासाला न जुमानत, ती आपल्या नवऱ्या बरोबर पूलच्या खाली कसे बसे दिवस काढत होती. तिला वाटलं होत कि, शहराकडे बरीच खुशाली असते, पण दोन वेळच पोट भरण्याशिवाय इथे कसलीच खुशाली तिला दिसली नाही. काही दिवसातच तिचा नवरा दारू डोसलायला लागला. शहरातली चमचमाट यांच्या पासून कोसो लांबच राहिली होती. मग हिने पण निच्चय केला कि जो पर्यंत ठोस उत्तर नाही तो पर्यंत अपेक्षा नाही. मध्यंतरी काही सोसिअल वोर्कर तिच्याकडे येऊन गेले होते, ती त्यांची मदत घेत आपली जीवनमान सुधारण्याचा प्रयत्नात होती. परत गावाकडे त्या जातीय-वर्गीय परिस्तिथीला सामोरे जाण्यापेक्षा शहरातल्या भयाण अशा वास्तवास सामोरे जावे, असे तिला मनातनं वाटायचे. आज झालीत तिला सात वर्षे – तिच्या निच्चयामुळे तिने बरेच काही कमवले होते. एवढी समजदार कि तिने बाळ जो पर्यंत खुशाली येत नाही तो पर्यंत नाही होऊ द्यायचाचा निर्णय घेतला. नवरा तिचा कोपरखैरणे तल्या एका बाटली कंपनीत आहे. आणि जास्त पीत नाही, occassionally घेत असतो. तिची सासू कधीच वारली होती म्हणून सासू चा त्रास तिला माहित नाही. तिचे आई बाबाला पण कोसो गरिबी म्हणून तिथनं काही अपेक्षा ती ठेवत नाही. भाजप चा नवीन नियम आला – तिच्या भाजीपाल्याचा दुकान अतिक्रमित आहे म्हणून तोडलं गेलं. खचली नाही. तिने डोक्यावर भाजी पाला घेतला आणि विकायला सुरुवात केली. शहरातली भरमसाठ उकचवर्गीय जीवनाचा तिला स्पर्श पण नाही झाला होता, पण एक सुख तिला शहरात होते, तिच्यावर पुरुषांचा कंट्रोल ज्याप्रमाणे गावी होता, त्याप्रमाणे शहरात न्हवता. तिच्या संसाराच्या गाडीला काही टोमणे मध्यन्तरी लागलेत. ती सावरली त्यातनं. तिचा नवरा आज घडीला कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करत असतांनाच युनियन मध्ये काम करायला लागला. जीवाची साथ त्या दोघांची झाली. सोसिअल वर्कर पण तिला बऱ्याच रित्या मदत करीत होत्या. गांधीगिरी का असेना सांगत होत्या. ती भक्कम. नाही बळी पडली मोहमायात. शहरच दगदगीचा जबळयात जीव ओतावा असं काय आहे या जातीय-वर्गीय अरिष्टांमध्ये तिला कळून चुकलं होत. जातीने चांभार ती पण तिने जातीने दिलेले काम न स्वीकारता शहरातले इन्फॉर्मल सेक्टर मधल्या वेगवेगळे कामे केलीत. ती म्हणते – मी शिकली नाही पण शहराकडे चला, म्हणजे वेगळं जीवन जगा. कष्ट करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *