आला दिवस कसा जगायचं

रविवार हि जगला जातो
पण एका खोलीत, त्या ६०० रुपये महिन्याचा इंटरनेट च्या
भरवश्या वर
गप गुमान सहन करतो
तो लाथा बुक्क्यांचा मार
इकडे जाळपोळ नि तिकडे अत्याचार
सोसिअल मीडिया त ऐकायला भेटतात
चुकून लाईव्ह स्ट्रीमिंग केली तर
IPL चे छक्के चौके आणि मोदींचे पण
काय करावं कळत नाही रविवारी पण
खाली जावं नि ९० मारावी
अन मग आपली विश्लेक्षण
आलेल्या विरंगुळाखातर
त्या इसम ला
बळी पडलेल्याला सुनवायचं
रविवार हि कसा जातो मग कळत नाही
येतो सोमवार
मग सगळं विसरायचं नि धंद्याला लागायचं
तीच कटकट पुन्हा सहन करीत
शुक्रवार संपवतो
मग मंगळवार, बुधवार, गुरुवार काहीही काम आलेली असतील
तरी ती टाळायची
टाळणे आजकाल सवयीचा भाग आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *