इमॅजिन करायला लाज वाटते

डोक्यातल्या बऱ्याच किड्यांसोबत तडझोड करून, पत्रकारिता शिकण्यासाठी TISS मध्ये असतांना थर्ड किंवा सेकंड सेमिस्टर ला (हेहेहे, आठवत पण नाहीये कि कोणतं सेमिस्टर नक्की) संधी मिळाली. बाई ने चांगलंच शिकवलं. पण, शेवटचे सेमिस्टर संपल्यानंतर लगेच प्रोडूकशन च्या कामासाठी बांद्रा गाठलं. काही महिने (जवळ जवळ वर्ष) तिथली फेरी. पण डायरेक्ट असा संपर्क न्हवता पत्रकारितेत. तदनंतर कुठे आता twocircles.net साठी काम केलं, एक वर्ष. चांगलाच अनुभव. काही घोडचुका पण केल्यात. नंतर हिम्मत नाही झाली. पत्रकारिता एक ट्राय होता. आता जेवढं इंट्रा-इंटर कोम्मुनिकेशन होईल त्यावर भर आहे, पण पत्रकारिता एक चांगला व्यवसाय म्हणून पण बघत नाही. झालं असं आहे कि, पत्रकारिता हि लोकशाहीचा भाग म्हणून पण इमॅजिन करायला लाज वाटते. काही बोटांवर मोजण्या इतपत होतकरू पत्रकार सोडलेत तर सगळे चाटू दिसत आहेत. राजदीप सरदेसाईच, ते मिम फिरल्यानंतर आणि सरदेसाई ला चांगला पत्रकार म्हणून डिफेन्ड करणारी व्यक्तींची प्रतिक्रिया बघून तर असं वाटत आहे कि, पत्रकारिता फक्त गेम होता त्याव्यतिरिक्त काही नाही. बरं, अंबानी, अडाणी आणि तत्सम सगळ्या चोरांनी पत्रकारिता आपल्या खिश्यात घेतली आहे, असं वेगळं सांगायला पण नको. मुद्दा आहे कि, ‘खिश्यात घेणारी’ चोरांच्या विरोधात, बोलणारी इसमेच पत्रकारितेला विकायला काढत आहेत.

बाबासाहेबांनी न्यूस पेपर काढलीत म्हणून अंधाधुंद पत्रकारितेचा बचाव खपवून घेतला जाणार नाही. दक्षता बाळगावी.

पण, माझी पत्रकारिता ती TISS मधेच संपली, याचं मला खूप अभिमान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *