दोन गाण्यांची तुलना आणि माय मराठीच्यावरची एकाधिकारशाही

मराठीभाषे साठी गळे काढणारे त्यांना एक साधी गोष्ट कळत नाही कि या देशामंध्ये हजारो वर्षांपासून परकीय येत आलेले आहेत. इंग्रज त्यातहि उत्तम उदाहरण आहेत आणि खैबरखिंडीतून आलेले आर्य त्याहून अधिक उत्तम उदाहरण. जेव्हा परकीय भांडवल येते, तेव्हा भाषा येते, सवयी येतात, संस्कार येतात. (In this context present day state govt and its celebration of Marathi Bhasha Gaurav Divas but there is always someone or some group who wanted 27th February be as Marathi Bhasha Gaurav Divas and not any other day)

मराठी भाषेचा संघर्ष, संवर्धन आपल्याला फक्त आणि फक्त प्रमाण भाषा, पुण्यातल्या आणि मुंबईतल्या काही देशस्थ आणि कोकणस्थ ब्राम्हणांचे किती मोठे योगदान आहे ते दाखवते. मग येतो साहित्य आणि तिच्या अकॅडेमीच्या पुरस्कारांची ओढ, लालच आणि भाषेला बेईमान सवयी. असं झालं कि वाटत साहित्य जनमानसाच नाही तर एक काल्पनिक कथा गोष्टी होऊन जातात किंवा मग ठराविक गट समूहात चाललेल्या घडामोडीं आणि त्यांचा एकाधिकार होऊन बसतं. मग बटाट्याची चाळ सारखे प्रयोग, नाटक आणि ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र जी aristocracy आणि व्हिक्टोरियन एरा ची कॉपी आहे ती चालू होते. ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र आपल्याला माहीतच आहे कि जिथे त्यांच्या गट समूहाचं भलं तिथे ते पूर्ण पणे चाटूगिरी करतात. आणि याचा परिणाम असा झाला कि कालांतराने जातिव्यवस्थेच्या उतरंडीत दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या नंबर वरचे हि तसेच कॉपी करायला लागलेत. 

२००० वर्षांपूर्वी हाड राजाने ज्या प्राकृत भाषेचा आग्रह केला होता गाथा सप्तश्रही मधून, त्या प्राकृत भाषेच्या माध्यमातून संत नवनाथ, संत दत्त असो, महानुभाव पंथ, चक्रधर स्वामी असो किंवा मग वारकरी संप्रदायाचे कुणीहि संत असो सगळ्यांनी मराठी – प्राकृत भाषा म्हणून घरोघर पोहचवली. मराठी भाषेला संतांनी एक वेगळ महत्व प्राप्त करून दिले. ज्या मराठी भाषेला छत्रपती शिवाजी महाराजांनी राजभाषा बनवली ती मराठी भाषा आजपर्यंत १२ कोटी पेक्षा जास्त लोकं बोलतात. या भाषेची वस्तुस्थिती काय आहे आणि तिला कुसुमाग्रजच्या जयंतीलाच का साजरी करतात, हे खरं आपल्याकडून लपवलं गेलं आहे. म्हणजे ३ पर्संट लोकसंख्या असलेले ब्राह्मणांमधून देशस्थ आणि कोकणस्थ ब्राम्हण… कितीचं असतील?  

ब्राह्मणी कट कारस्थाने कुठल्याही प्रॉडक्टच्या जाणीव आणि नेणिवेतून बाहेर येते. ते ओळखणे तितकेच जिकरीचे आणि धोक्याचे. ब्राम्हण किंवा मग जातीच्या उतरंडीत असणाऱ्या कुठल्याही वर्ण आणि वर्गाच्या प्रॉडक्ट मधून बाहेर दिसतेच मग उतरंडीतच्या खालोखाल असणाऱ्या शोषित पीडित मजूर अपृश्य वर्ग जेव्हा त्यांच्या वर्गाचं प्रॉडक्ट करतात किंवा मग साहित्य निर्मिती करतात – त्यांचे नायक आणि नायिका त्यांच्याच वर्गातील का असतात? अण्णाभाऊ साठे यासाठी उत्तम उदाहरण आहेत. हे असून सुद्धा साहित्यावर ज्यांचा एकाधिकार होता त्यांनी वेगवेगळे प्रयोग चालूच ठेवले होते. त्यांचा एकाधिकार आणि त्यांच्याकडे असलेले प्रशासन आणि संसाधने त्यांच्यासाठीच काम करीत होती असं म्हणणं चुकीचे आहे का? काही वेगळं थोडस बाहेर यायला लागले कि एकाधिकार असणाऱ्या ब्राम्हणी गट समूहाचं लेबलिंग लावणे लगेच activate होते. काही साहित्य त्यांच्यासाठी मग ग्रामीण साहित्य आणि दलित साहित्य होते. बागुल, पवार, ग्रेस आणि ढसाळांच्या रूपात मग विद्रोही लिखाण पण यायला लागले. एक वेगळा वलय निर्माण झाला. पण लेबलिंग होतेच. 

साहित्यात ज्या घडामोडी होतात, इव्हेंट्स आणि इंसिडेंट्स होतात, सगळ्याच काउन्ट करणे अशक्य गोष्ट आहे. आजकालच्या रील्स आणि डिजिटल प्रॉफिट ड्रिव्हन मार्केट मध्ये भाषा, साहित्य हे फक्त OTT च्या रिजनल सिनेमा तयार करण्यासाठीच जणू काय आहे असा भाष होतो. मेट्रो पॉलिटन शहर, ग्रामीण भाग आणि दुर्मिळ गावे यातली दरी नुसती divide अँड rule अशी नाहीच तर ती डिजिटल divide च्या पल्याड गेलेली आहे. अशी अवस्था आपल्याला जनतेच्या सुरातील असंतोष, राग हि दाखवतो पण प्लॅटफॉर्म्स सगळे रिजनल सिनेमाच कौतुकच सादर करीत आहेत. सवयीचा भाग. जुनी संज्ञा जी साहित्य काय असतं ते दाखवते. म्हणजे –  “साहित्य हा वास्तव जीवनाचा आरसा आहे”. आताचे साहित्य वास्तव जीवन तर सोडाच पण प्रॉफिट ड्रिव्हन मार्केटच वलय पासून बाहेरहि येत नाही उलट वास्तविक जीवन धूसर करत असते. 

२७ फेब्रुवारी आणि शिवसेना 

शिवसेनेचं मराठी भाषा संवर्धन करणारी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ; मराठी भाषेच्या एकाधिकार ज्यांच्याकडे होता आणी ते कोण होते हे सगळ विसरली किंवा व्यवस्थेने त्यांना हे सोयीचे राजकारण समजू दिल नाही. मराठी भाषा गौरव दिन हे मुळातच खूप गाफील आहे. संत परंपरा आणि ज्यांनी रक्त सांडून मराठी भाषा घरोघरी पोहचवली किंवा महाराष्ट्र राज्य निर्मिती साठी ज्या हुतात्म्यांनी जीव गमावला किंवा ती पूर्ण फडीला इग्नोर मारणं, भाषेवरचं प्रमाणीकरण (standardisation) टिकवून ठेवण्यासाठीच तर नसेल ना? 

वि वा शिरवाडकरांची जयंती म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छापील पुस्तके दरवर्षी प्रकाशित करण्याची अनेक वर्षाची मंडळाची परंपरा आहे. ते कुणाचे साहित्य छापतात ये काही नवीन अधोरेखित करायची गरज नाही. भाषिक राज्य निर्मिती आणि त्या सगळ्या संसाराला समजून काम करणारी साहित्यिक मंडळी महाराष्ट्र साहित्य, संस्कृती आणि इतिहास आणि वास्तव दाखवणारी परंपरा ठराविक ढाच्यात टाकून तिचा खून कधीच करण्यात आलेला आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाङमयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच ब्राह्मणी सौंदर्यशास्त्र बहुविध (diversified content) वाङमयीन निर्मितीसाठी कार्यरत होती. शिवसेना आता जरी केंद्र सरकारला देशाच्या आर्थिक राजधानीत बसून धमकावू शकत असेन पण मराठी भाषेवर अभिजन म्हणजेच ब्राम्हणी वर्गाचा पगडा आणि त्या दर्जाला कुणी धक्का लावत असेन तर वेळोवेळी त्यांच्या बचावासाठी धावून येणे यात – साहित्याच्या नेणिवेतील छुपी खेळी तर दिसतेच. ते शिवसेनेला कळून येईल अशी शक्यता हि बाळगणे मूर्खाच काम आहे. 

मराठी भाषेचं सांस्कृतिक वैभव हि संत परंपरेने दान दिलेलं भेट आहे. शिवसेना ते हि विसरते. शिरवाडकर आणि तत्सम साहित्यिक, कला क्षेत्रात वावरणारी ब्राह्मणी लोक दान दिलेली भेटची मलाई खाऊन मोठी झालेली आहेत. खर तर अभिजन वर्गानेच माय मराठीचे सांस्कृतिक राजकारण करून प्रमाण भाषेचं गिर्हान प्राकृत भाषेला लावल आहे. 

अभिजात भाषेच्या दर्जासाठी पुरावे एकत्र होत नाहीत, पण एक पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या तोंडून आलं कि बहुजन साहित्यिक वर्ग असाही शांत बसणाराच आहे, तो अजून निस्तावतो. ज्या राज्याची राजभाषा मराठी – अश्या शिवाजींचा दिवस हि किंवा कुठलीही सरकार मराठी भाषा गौरव दिन साजरी करू शकली नाही याला पण एक अर्थ आहे. 

काही दशकागोदर एक मराठी गौरव गीत आलं होत. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक टीव्ही चॅनेल चालू करण्यात आलं होत “मी मराठी” आणि दिलेली लिंक त्यांचं ब्रीद होत. पण हि सगळी साहित्यिक मंडळी आणि प्रॉफिट ड्रिव्हन ब्राह्मणी चलाखी त्या गाण्यात व्यवस्थित दिसते. – 

या गाण्याचं सादरीकरणच ब्राम्हणी प्रमाण भाषेला अधोरेखित करणे आहे, असे वाटते.  

लोकशाहीर संभाजी भगत असल्या या मांदियाळी वरती नेहमीच लिहीत आलेले आहेत त्यांचं एक “माय मराठी” ला वाहिलेले गीत म्हणते कि, ‘आज हजारो multi नॅशनल कंपन्या आणि त्यांचे परकीय भांडवल या भूवरती आलेल्या आहेत. जो पर्यंत आपण यांना लढत नाहीत तो पर्यंत भाषेची लढाई पूर्ण होत नाही. एका बाजूला परकीय भांडवल आणि दुसऱ्या बाजूला हि उतरंडवादि व्यवस्था. लढाई तर दोघ बाजूंनी आहे. साहित्याच्या नावाने नुसती जत्रा आणि संमेलने भरवून चालत नाही. त्यासाठी पुण्यात आणि दादर मध्ये राहावं लागत नाही. त्यासाठी पूर्ण भूभाग हिंडावं लागतं. समजून घ्यावा लागतो’. 

माय मराठी

खालील गाणे हे संभाजी भागात यांनी लिहलेले आणि कंपोस केलेले आहे. हे गाणे नुसते, भाषेंचा इतिहासच नाही तर, महाराष्ट्र बनवण्या मागची तगमग पण दाखवते.

माये मराठी गं माये 
तुझे सुखाचे ग सुभे 
तुझे गुणगान गाया 
चंद्र सूर्य तारे उभे 
उभे व माय 
चंद्र सूर्य तारे उभे 
माय व मराठी लक्ष लेकरं लल्लाटी 
लेकरं लल्लाटी माय लेकरं लल्लाटी
अन संत पंत तंत लक्ष हिरे तुझ्या पोटी
संत पंत तंत लक्ष हिरे तुझ्या पोटी
माय ओ मराठी तुझ्या खांद्यावरी तुका
खांद्यावरी तुका खेळे मांडीवरी चोखा
काळ राज्याचा करुनि डफ पोवाड्याची तोफ 
डागतो तंत हा जी जी 
शाहीर हा जी जी ग
माये मराठी ग माये 
तुझ्या वैभवाच्या पायी 
गावकूस सोसियले 
तरी सोडले ना आये
माये तरी सोडले ना आये
माय ग मराठी तुझा झेंडा फडकला
झेंडा फडकला तुझा झेंडा फडकला 
झेंडा फडकला युरोपात नेला 
झेंडा अमेरिके नेला 
झेंडा फडकला माये झेंडा फडकला
सांग कुणी नेला तुझा झेंडा कुणी नेला 
झेंडा फडकला माये झेंडा फडकला
युगे युगे दबलेल्या दलितांनी नेला 
झेंडा फडकला माये झेंडा फडकला
लेखणीने नेला त्यांच्या साहित्याने नेला
तुझ्या घरामंधी माये, काय तुझे हाल झाले 
तुझ्या चरणाशी झरे, ते ग अमृताचे वारे
तोंड बंद ज्यांचे केले 
केल व माय, तोंड बंद ज्यांचे केले
माय ग मराठी तुझा घात कुणी केला
घात कुणी केला माय घात कुणी केला 
घात त्याने केला नुसता कल्ला ज्याने केला
बाजार ज्याने लावला माय गजर त्याने केला 
घात कुणी केला माय कल्ला कुणी केला
जत्रा भरयेली ग माय जत्रा भरयेली
हवसे गवसे नवशे सतरा जत्रा भरयेली 
जत्रा भरयेली ग माय जत्रा भरयेली
ऐरे गैरे नत्थू खैरे 
जत्रा भरयेली ग माय जत्रा भरयेली
जागा जागा बांधवांनो वाणी ढापयेली 
जत्रा भरयेली ग माय जत्रा भरयेली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *