परतीचा वेळ

P_20171028_123429

सये, तुझ्या परतीचा वेळ, उंचाक गाठतो
म्हणतय सफर नाही मोकळा
शोधलं ते आतच होतं
उंचाकाच्या उत्तराचा-प्रश्नाचा हा सफर
पण परतीचा वेळ आहे तो
कल्पनेचा सफर
अंधाऱ्या वस्तीतला हा सफर (आमच्या बिल्डिंग च्या जिन्याची लाईट गेली आहे)
संपतो कामाच्या गडबडीत
पण संध्याकाळ होत होत
उंचाक परत गाठतो सीमित अन विखुरलेल्या भावना
मुळीच नाही, त्याला सांभाळत
तो माझ्यामुळे उठला, आणि अडकवलं त्याने तुला
ऐकायला तुला नाहीत कुणी
हरामखोर ऐकत नसतात
पण वेळीच दखल न घेता जर
परतीचा वेळ लांबला कि प्रश्न-उत्तराचं सेशन लांबतं
ऐकशील तर
परवडेल
कारण अंधाऱ्या वस्तीत लाईट लावायचा आहे
सोसायटी वाल्यांना बोलायचं आहे
तू पुढं सर
मी आलोच
तो उंचाक गाठतो समजून येतो
उंचाक खोट्याने बनला आहे अशी समजूत ठेवून
तो कशाने बनला आहे
त्याचा वाचा फोडतो
परतीचा वेळ उंचाक गाठतो कारण
आपलं घर सेकंड फ्लोर ला आहे
तू ऐकलं का?
सेकंड फ्लोर क्लास आहे
ऐकलं का?
त्या गल्लीच्या गजबजलेला आनंद तर नाही उंचाक गाठतो?
उंचाक वाईट आहे
समज-धैर्य-इंटेंशन आणि नजर वरती जातं
विचार पण वरती जात असतो
उंचाक आपला पत्ता आहे, आहे का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *