बाकी इतिहास, बाकी वर्तमान

638890-bhima-koregaon-protest-dna.jpg
Image source : https://goo.gl/uEzUym

गुन्हेगार ठरवणारे अशा भरपूर गोष्टी आहेत या जगात. प्रत्यक्ष अशी कुठलीच गुन्हेगारी न केलीली ‘जनता’ एरवीही गुन्हेगारच आहेत. कायद्याच्या चौकटीत बसणारी हि ‘जनता’ कधीच नाहीये. साधं यांनी बांबू आणि पत्राची झोपडी पण बांधली तर हे अतिक्रमण करणारे ठरतात. हे जिथं काम करतात तिथे बिगर परवान्यांचा धंधा म्हणून ओळखला जातो तसच काही झालं तरी हेच तुरुंगात जातांना दिसतात कारण; ते तिथे काम करतात. या व्यतिरिक्त हि ‘जनता’ without आधार कार्ड, ओळखपत्र, रेशन कार्ड असे काहीच नसली तर ते शांघायमध्ये सॉरी सॉरी मुंबई मध्ये त्यांना माणूस असण्याचा परवाना नसतो. मुंबईच्या श्रीमंत वातावरणात ज्यांची राहायची ऐपत असेल त्यांनींच इथे राहावं असा message जणू संघ प्रेनित मोदी सरकारने काढलेला आहे किंवा आधी पासूनच होता.

एवढी भली मोठी प्रास्ताविक लिहिण्याचं कारण म्हणजे या ‘जनतेने’ बंद पाडलेली मुंबई. कारण होत भीमा कोरेगाव च्या ‘त्या’ सेलेब्रेशनच. भिडे-एकबोटे आणि बरेच साथीदार काम करतांना दिसत होते असे काहींचे म्हणणे, अन सामान्याला पटण्या सारखे पण आहेत. अन मग तीव्र प्रतिसाद राज्यभर उमटलेत. सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि कौटुंबिक परिस्थिती या घटनेने ढवळून काढली. मुंबईचा चाकरमानी ‘दांडी यात्रा’ करतांना दिसत होता. आणि उछब्रु वर्ग हा आपापली कार सुरक्षित कशी राहील या गर्तेत त्याची चैन गहाण ठेवली गेली होती.

तसा हा प्रश्न सगळ्यांचा होता म्हणून तर काय मुंबई बंद पडली आणि बघता बघता पूर्ण महाराष्ट्र हि बंद झाले. कधी नाही त्या मध्यप्रदेश मध्ये पण पडसाद उमटलेत म्हणे. हे सगळे होत असतांना ज्या ठिकाणी दगडफेक झाला होता, ‘जो बायकांनी केला होता, ते गाव म्हणतय दोघे साईडने बघितलं तरी, ‘पिळवणूक’ त्यांची झाली आहे’, असं आजचा नवाकाळ म्हणतोय. राजकीय पक्षांचे ‘शांततेचे कार्ट’ गल्ली बोळ्यात फिरतांना पण दिसतंय. भिडेच लालबाग च व्याख्यान (बहुतेक असा अंदाज वर्तवला जात आहे कि व्याख्यान होणारच आहे, आणि मुंबई च ९२ रूप परत  दिसणार आहे.) पण मोडीत काढण्यात आलेलं आहे. जर वस्तुस्थिती भरकटवण्याची आहे तर मग बाकी इतिहास आणि बाकी वर्तमान विसरता काम नये.

मूळ मुद्द्यावर येतो. काल पर्वा मुंबई बंद झाली. कारण होत महारांना (संकुचित आहे, पण आहे)  डिवचण्याचा; दोघ बाजूंनी. त्या बायकांनी म्हणे वरून जमलेल्या जमवावरती हल्ले केलेत म्हणजे दगडफेक केली (वरून शस्त्र खाली फेकणे हि कला/प्रथा खैबरखिंडीतुन आलेली आहे, संरक्षणशास्त्र नावाचा विषय असतो, वाचा, संदर्भ भेटतील). मुंबई चिघडली, धारावीतले आदी-द्रविड, कल्याण-डोंबिवलीतले खान्देशी, बांद्र्याचे सोलापूर-कोल्हापूरवाले, परेल-लालबागचे कोकणी, विरार-पनवेलचे गुजराती मिक्स, देवनार-गोवंडी-पांजरपोळचा युपी-बिहारी मिक्स (मराठवाडा या लायनीत नाही बसत कारण मराठवाड्याची ‘जनता’ फ्लाय ओव्हर च्या खाली किंवा बिल्डिंग च्या आडोशाला कुठे तरी श्वास घेतेय) ‘जनता’ त्या बायकांच्या दगडफेकीला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरली. लोकल अडवल्या गेल्यात, मुंबई मिनटात चिडीचूप. whatsapp ने कमाल केली आणि मधला जातीयवादी वर्गला परत या रस्त्यावरच्या ‘जनते’ला गुन्हेगार ठरवण्याचं कारण भेटलं म्हणजेच घरातनं बाहेर न पडण्याचे कारण भेटलं.

त्या दिवशी ऑफिस मध्ये होतो अचानक कोलाह झाला. ऑफिसचे तामिळ-तेलगू-मराठी-मल्लू अन काय काय ब्राम्हिन म्हणत होते, “हे लोक असं कोपऱ्यात का प्रोटेस्ट करत नाही, उगाच काम करणाऱ्यांना त्रास, बेशिस्त कुठले” (खर तर थोबाडीत हाणायला पाहिजे होते मी, पण माझा स्वभाव नाही).

मुंबईत कुठेच कुणाला (मधला जातीयवादी वर्गला) भीमा-कोरेगावात २०० वर्ष्याच्या निमित्त का जमा होता हेत याची देखील कल्पना न्हवती, पण मुंबई बंद होत आहे, याचा जेवढं गदारोळ झाला, तेवढा तर लोकसभेत पण नसेल झाला. एक बंगाली ब्राम्हण तर म्हणे ‘मुंबई च स्पिरिट कधीच संपणार नाही, बंद जरी झाला तरी’.

भावना नावाची गोष्ट जर अस्तित्वात आहे, तर ज्या ५०० महारांनी तेव्हा काय केलं होत त्याचा आदर ठेवून ‘दलित’ (महाराष्ट्राचा चांभार स्वतःला कधीच दलित म्हणवून घेत नाही, हि पण वस्तुस्थिती आढळून येते) जातात माथा टेकायला. त्यांच्याच गोळख्यामधील काहिंवरती हल्ला झाला. न भूतो, न भविष्यते, चक्क पोलीसच बंद पाळण्यासाठी रस्त्यावर उतरून दुकान बंद करतांना दिसत होते. एक मैत्रीण, “बर झालं, ड्राइवर एका दिवसाची सुट्टी मागत होता, या निमित्ताने तरी बिचाऱ्याला सुट्टी भेटेल”.

बंद मागचं राजकारण समजून घेण्या अगोदर, मुंबईची हि झालेली गत आणि तिचा ‘बाकी इतिहास’ पण समजून घेणे गरजेचे वाटते. हॅहॅहॅ मलाच. आपली (छे! त्यांची) वृत्तपत्रे, साहित्य, सिनेमा, राजकारण, अर्थकारण, गप्पा (आजकाल डिजिटल) सामान्यांचे म्हणून चर्चिले जाणारे प्रश्न हे सगळं  धारावीचा आदी-द्रविड, कल्याण डोंबिवलीतला खान्देशी, देवनार-गोवंडी-पांजरपोळचा युपी-बिहारी मिक्स आणि तत्सम तळागळातील जनता जी उदरनिर्वाहासाठी स्थलांतर करून राहत आहे, आणि हीच ‘जनता’ संपूर्ण राग बंद च्या स्वरूपात काढण्याचा प्रयत्न करत होता, या सगळ्या बाबतीत माझी ड्राइवर असलेली मैत्रीण किंवा ऑफिस मधले ब्राम्हण; कधीच concern तर सोडा पण ध्यानी मणी पण दिसत नाही, इतक्या संकुचित स्वरूपाचं यांचं जगणं आहे. विशिष्ट वर्गापुरतं मर्यादित असलेले विचारशील लोक, यांच्या अस्तित्वाखाली दडपला गेलेला किंवा दडपला जाणाऱ्या अनेक संख्या असलेला वर्गाचा शब्द मुख्य प्रवाहात उमटत नाहीये. म्हणून कि काय चळवळ हि मध्यम वर्गीय झालीये, याच्यावर विश्वास ठाम होईल.

हा राग फक्त भीमा कोरेगाव न्हवता, तर हा राग नोटबंदी, GST आणि बऱ्याच गोष्टी ज्यात मुंबईला स्मार्ट बनवण्याच्या प्रयत्नांच्या विरोधातला आक्रोश होता. टाटा, अंबानी, अदानी, मित्तल, जिंदाल, लोढाच शोषणाधित राजकारणाविरोधी बंड पुकारला होता. आणि मुंबई दीड दिवस बंद पाडली होती. एका रिक्षावाल्याला विचारलं, “भाऊ, झेंडा का लावला आहे?” तो उत्तरला, “अब जयभीम बोलो और किधर भी चलो नही है, अब जयभीम बोलो और बदला लो है”. मी म्हटलं कुणाशी बदला घेतोयेस, तर म्हणाला “वो पता करणा पडेगा, पहले आपको छोड देता हूँ”. (त्याच छोड देता हू मला चोद देता हु ऐकू आलं)

त्या दिवशी झालेल्या उपटशुभी कल्लोळात एका गोष्टीची कुतुहुलाने वाट पाहत होतो, ते म्हणजे शरद पवार कधी स्टेटमेंट देतो अन दुसऱ्याच दिवशी आला ना काका धावत. काकाने दिल्यात ना ग्वाह्या, आश्वासने. तो म्हणतोय कि दोघ बाजूंनी सलोखा व्हायला पाहिजे. हा सलोखा म्हणजे मुंबईत काकाची असलेली प्रॉपर्टी आणि बेइज्जत कमाई असलेले टाटा, अंबानी, अदानी, मित्तल, जिंदाल, लोढा आणि असे बरेच मोठे धंदे असलेले शैतानांशी नातं. त्यातला त्यात काकाचे टप्पू भाड्याचे, ‘जनते’ला बिथरवण्याच्या नादात पण आहे, आणि संघी परंपरा तर आहेच कि जी जनतेला बिथरवण्यासाठी नेहमीच तयार असते.

परंतु, या सोबत हा प्रश्न पण टांगणीवरती आहे कि परिषद घ्यायला तोच दिवस आणि भीमा कोरेगावच का? गेलेत, ठीक हे, बायकांना एवढी मोठमोठी दगड आणून कोणी दिली? बंद पुकारले, ते पण ठीक आहे, मग बंद कसं पडणार? पुकारल्यावर शोषित झोपलेली जनता लगेच रस्त्यावर कशी काय येईल? संध्याकाळीच जनतेने शांत राहावं, अशी परत एकदा आरोळी का मारली? ३०,००० शोषितांवरती केसं फायली झाल्या आहेत, याची खबर यांना कशी काय नाही?

हा झाला पहिला भाग, दुसरा भाग असा आहे कि, सम्यक मार्ग घेणारे आपले ‘बहुजन’ वादी कोणाची वाट पाहत आहेत, जर त्यांना सगळं कळलं आहे तर, “अच्छा वक्त आने दो”, “टाइम पे केहने का?” सगळे पसार झाले आहेत.

कुठे नेवून ठेवलाय दलित सॉरी सॉरी महार माझा! काय चाललंय काय?

वरची सगळी निष्फळ बडबड… अरुंधती रॉय कधी जाणार आहे आठवले साहेबांसोबत स्टेज Share करायला? हा माझा कायमस्वरूपी प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *