बेकड छापखानेवाले

शेतकऱ्याचे आसूड एका बैठकीत संपवली गेलेली पुस्तिका नाही. फुले त्याचे वाचन बऱ्याच ठिकाणी करत फिरत होते. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी विचारपूर्वक वाचन ऐकून फुल्यांचा आदर सत्कार केला होता. शेतकऱ्याचे आसूड पाच भागात आहे. पहिला भाग, सरकारी खात्यात असलेली ब्राम्हण जातीवर आणि त्यांचं प्राबल्य कायम असण्या साठीचे त्यांचे कर्तृतांवरती आहे. दुसरा भाग हा गोऱ्या ऐतखाऊ गोऱ्यांवरती जे फक्त आणि फक्त ऐश आराम आणि चिल्ल मारायला भारतात येतात आणि काम नाही करत. अशाच गोऱ्यांच्या गाफीलपणामुळे सरकारी खात्यात ब्राम्हणांनी चाटूगिरी करत मोक्याच्या जागा कश्या पत्करल्या आहेत, ते हि दर्शवते. तिसरा भाग आहे, कि ब्राम्हण इराणातून कशे आलेत आणि त्यांनी इथल्या गोर गरीब जनतेला काबीज कस करत, कर्जबाजारी केले आणि देशोधडीला लावले. चौथा भाग शेकऱ्यांची तेव्हाची स्तिथी आणि पाचवा भाग आहे भट ब्राह्मणांना शिव्या…

दत्ताजी मेघाजी लोखंडे यांनी शेतकऱ्याच्या आसुडाचे पहिले दोंन भाग छापलेत; त्यात त्या दोघांची दोस्ती हि दिसत होती कि किती ते चांगले मित्र आहेत. पण अचानक दत्ताजी लोखंडे शेतकऱ्यांच्या आसूड छापायला मनाई देतात. तेव्हाच फुल्यांनी बेकड छापखानेवाले असे लोखंडे ला संबोधित केले होते. लोखंडे ला संबोधित केले तो वेगळा भाग आहे पण शेतकऱ्यांचे आसूड आज समजून घेणे मला तरी गरजेचे आहे. मी शेतकरी हि नाही, आणि सरकारी नोकर हि नाही. पण जी नोकरी करतोय त्या नोकरी मध्ये ब्राम्हण जातीची चाटूगिरी बघून त्रासलेलो आहे. आता शेतकरी जेवढा अविद्येने ग्रसित नाही तेवढा आजचा ब्राम्हण आहे. ब्राह्मणाला विद्या देणे; खूप जीवावर जाते. त्यांना हे पण कळत नाही कि त्यांच्या अशा वागण्याने किती तरी लोकांना किती तरी प्रकारचा त्रास सहन करावा लागतो. शूद्र आणि शुद्राती शूद्र जर शेतकऱ्याचा आसूड परत वाचेल तर डिप्रेशन मध्ये तर जाईलच पण काही तरी दुसरा मार्ग सापडेलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *