मित्रा

IMG_20170830_183411

अविश्वासाच्या काळात,
त्या जंगलीच्या राखणदाऱ्याला,
तुझ्या मध्यम वर्गाच्या जाणिवा-नेणिवा पावलो पावली ठेचत आहेत.
मध्यम वर्गीय जाणिवा-नेणिवा त्याला संपुष्ठात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या राखणदाऱ्याचं configuration आणि mapping चाललंय, मित्रा.
बघ मित्रा,
अवस्था वाईट आहे.
त्याच्या भेगाच नाही तर उद्या त्याचा एन्काऊंटर झालेला दिसेल.
सोबतीला, राजस्थान च्या मोर्च्याच उदाहरण पण आहे.
तेलंगणा बॉर्डर आठवडाभरापूर्वी झालेल्या चकमकीत त्याला संपवलंय.
तो तिथे मोर्चाचं करत होता.
या सगळ्या गोष्टी कधी मोजशील, मित्रा.
का नुसता तो लाल रंग, फोटो मध्ये छान दिसतो म्हणून
त्याच गौरवीकरण करशील.
का? तर तो तुझ्या तो तुझ्या मुंबईत आलाय, म्हणून.
त्याच स्वागत
परक्यांसारखं करतोयस.
तो आज काम्रेड झाला आहे अन
तोच शेतकरी पण.
त्याने सुरुवात केली तेव्हा तो आदिवासी होता, मूलनिवासी होता.
राखणदार होता.
समज मित्रा,
समज.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *