रेसिप्रोकेल इंटरॅक्शन्स — संरचना (सुपरस्ट्राक्चर) आणि अर्थशास्त्राचा संबंध

घटना घडत असतानाचा काळ, भूतकाळात तरी प्रतिबिंब सोडून गेलेले आहेत. इतिहास डॉमिनेन्ट आहे कि नाही हा मुद्दा बाजूला सारून, रेसिप्रोकेल इंटरॅक्शन्स होत असतांना एक जाणीव येते कि, मिथ्या (महाभारत, नाट्यशास्त्र नि मेनस्ट्रीम सिनेमा) आणि भौतिकवादी संरचना (कल्चर, ब्युरोक्रॅसीस, टेकनॉलॉजि, रिलिजन) भूतकाळातल्याच प्रतिंबीबांची आठवण करून देत असतात. सौंदर्यशास्त्राला बंदिस्त अवस्थेत टाकतांना मिथ्या-चौकटधारी रूप, सौंदर्यशास्त्राला अखंडित स्वभावाने बहाल करते. धर्माला सांस्कृतिक, ब्युरोक्रॅटीक आणि टेकनॉलॉजि च्या समोर उभं केलं तर द्वंद्व होईल. मिथ्या रेसिस्ट करेल, मग त्यानंतर टेकनॉलॉजिकल ब्युरोक्रसी ला संस्कृती बनवेल. मुसिक (गाणं, आणि ती गाणी गाणारे, निर्माण करणारे इडेंटिटिस) सौंदर्यशास्त्राचं रूप बदलावतं. मिथ्याला इन्विसिबलि फायट देणारी एक अवस्था आहे. ती म्हणजे सौंदर्यशास्त्र. कल्चर, ब्युरोक्रसी आणि टेकनॉलॉजि ला सौंदर्यशास्त्र पाहिजे. मग मिथ्या आपल्या धर्माचा अट्टाहास सोडावा लागेल. वास्तव रूपात सौंदर्यशास्त्रच राहील. सौंदर्यशाश्त्राला लागलेली कीड म्हणजे धर्मांधित कॅरॅकेटर्स. रामायण, महाभारत, नाट्यशास्त्र नि मेनस्ट्रीम सिनेमाच बामणीय रूप म्हणजे यांची पिलावड. टेकनॉलॉजि फक्त मोबाईल आणि इंटरनेटच नाही तर जे काही इनोवेशन आहे त्याला म्हणता येईल.

आता रेसिप्रोकेल इंटरॅक्शन्स —
संरचना (सुपरस्ट्राक्चर) आणि अर्थशास्त्राचा संबंध.
कॉर्पोरेट सेक्टर मध्ये पैसा जास्त मिळतो, म्हणून तिथे काम करण्याची ओढ जास्त दिसून येते. अशाच प्रकारचे सुपरस्ट्राक्चर शिक्षकी पेशा, राज्यसेवा किंवा कुठल्याही प्रकारची प्रोफेशनल लायवलीहूड सोर्स. मग यांच्यात नव्याने निर्माण झालेली संगीतातल्या क्षेत्रातील बाजारीकरनाला काही अर्थी मजबुती येत असते. इतिहासातल्या भौतिकवादाचं कणाकणाचं भांडवलीकरण करण्यात आलेले आहे आणि गाण्याच्या बाबतीत गुन्हेगारी झाली आहे. लोकगीत आणि शाहिरीची ज्या अर्थी विल्हेवाट लावण्यात आली त्याला भांडवलीकरणाचा गुन्ह्याचा कारभार आणि जात भांडवली आवडी निवडीही सामूहिक रित्या लावण्यात आल्या. म्हणजे— कोळी गीतांमध्ये समुद्र नि त्याला लागून असलेले कामधंदे सोडून काहीही येत नाही. विठ्ठल उमप अपवाद म्हणता येईल. विद्रोहीपणा कोळी गीतांमध्ये दिसत नाही. या उलट शहरीकरणाने दिलेल्या क्षणाक्षणाच्या फोर्सफुल टेकनॉलॉजिच उद्दात्तीकरण आणि स्तोम बजावण्याचं काम कोळी गीतांमध्ये दिसते (जर असतील तर ज्ञानींनी ज्ञान वाटावे). पिस्सीमीसम आणि शक्य असलेल्या तार्किक घटनांच्या पाठीमागे सुपरस्ट्राक्चर आणि जातिभांडवल आर्थिक-भौतिक जखडयात अडकलं. पिस्सीमीसम असा दिसतो कि, फेसबुक वरती १०० लाईक भेटले तरी गाणं छान झालय असं म्हणणारे किंवा मग मीडियाचा वापर जातीव्यवस्था तोडण्यासाठी व्हायला पाहिजे, असं म्हणणारे जातीची लढाई ची विल्हेवाट लावत आहेत म्हणजेच लोकगीत आणि शाहिरीची विल्हेवाट लावली. रेसेन्ट हिस्टरी मध्ये घडलेल्या गाण्यांच्या बदलाच्या बाबतीत लोकगीत आणि शाहिरी तुन इन्स्पिरेशन घेऊन बनवल्या गेलेल्या बदलला व्हॅल्यू च्या अकारण चर्चेला पण ‘बडे’ केलं गेलय.

सुपरस्ट्राक्चर च्या अकारण व्हॅल्यू निर्मितीत शाहिरी ला अन्यायाच्या विरोधी लढणे पर्याय म्हणून बघू शकतो अशी डॉमिनेन्ट अट तयार झाली. पण शाहिरीवर हा जो भेदभाव होत आलेला आहे त्याच कारण तर जातीतच दिसते, पण कॉर्पोरेट सेक्टर ला ते माहीतच नसणार, कारण काही एक प्रकारचं कोम्मुनिकेशन करण्यात आपले बहाद्दर सपशेल फेल ठरलेत. सुपरस्ट्राक्चर च्या आंतरिक घडामोडीत रेसीप्रोकोल इंट्रकशन शक्य न झाल्यामुळे शाहिरी फक्त एल्गार क्रांतीचा नाही तर कॉर्पोरेट सेक्टर साठी भांडवल बनवून बसलं अन त्यातही लोकगीतालाही महत्वाच्या क्षणी भांडवल होता आलेलं आहे. ब्युरोक्रसी आणि टेकनॉलॉजि आजूबाजूला होणारा अन्याय-अत्याचार-भेदभाव-दुजाभाव नाही बघू शकत. तो विझन त्यांना दिले गेलेच नाही आणि त्याला वाईट म्हणणे शक्य पण नाही. ब्युरोक्रसी आणि टेकनॉलॉजि ला अन्याय-अत्याचार-भेदभाव-दुजाभाव बघण्याचं विझन देता येईल का? पण त्याचवेळेस मिथ्या पण नाही बघू शकत कारण यांचं सोयीनुसार उपयोग होत असतो. सोयीनुसार हे अर्थ बदलवत असतात. असत महत्वाचं रेसिप्रोकोल इंट्राक्षण. अशा क्षणी उरतात ते फक्त लोकगीत-शाहिरी तयार करणारे, ते निर्मिक जे अंडर-रेकॉगण्याईस आहेत. चेहरा कुणाचा तरी दिसतो आणि ते कॉर्पोरेट सेक्टर चे प्यादे पण बनतात. मिथ्या आणि धर्मांधित भौतिकवादी सरंचनेला अबाधित न ठेवण्यासाठीचे महत्वाचे कारण म्हणजे इलेक्टोरोल पॉलिटिक्स असेल पण कोणतं कॅण्डीडेट कोणत्या प्रकारचे राज्यशास्त्र करतंय ते सांगण्यासाठी शाहिरी-लोकगीत परत एकदा जोमाने येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *