लाचार कामगार?

एवढा लाचार आहे का कामगार?
त्याच्या मेहनतीची भाकरीचा थाट त्याला भेटो नाही?
बिहारी, युपी वाला भैय्या, बंगाली छोटा, अजून कोण कोण घरी परततोय, त्यात आहे का बामन बनिया जातीतला कोणी… EWS मधला कोणी??
ऑफकोर्से — नाहीयेत.
बामन बनिया कुठल्याही प्रदेशातला असेल तो मजाच मारतो, कुठेही.
त्याला जमतं — कुठेही असो तो. या भूप्रदेशातली जात, आणि तिची शोषणाधारित उतरंड त्याला माहिती हे म्हणून त्याला जास्त वेळ नाही लागत देशभक्तीच्या नावाने शोषण तैनात करायला. कोण आहे तो कामगार? बरेच रिपोर्ट्स आलेले आहेत. समजणे कठीण नाहीये. मुस्लिम किंवा मग हिंदूतला दलित ओबीसी समाज. मुस्लिमांमधला पण उच्च जातीय मुस्लिम नाहीच हे.
त्या कनोजिया चाचीला बोलता बोलता दोष हि दिला होता, कि पंधरा लाखाची लालच घेतली म्हणून भोगावं लागतंय. तिचा उलट प्रश्न होता तो क्या काँग्रेस कर रही थी काम? तीच पण म्हणणं बरोबर होत, तिच्याकडे पर्याय पण न्हवता. इंटरनेट अल्गोरिदम्स, टीव्ही, बॅनर, टपरीवाले, शिक्षक, दुकानदार, व्यापारी, ती ज्याच्यासाठी कपडे धुते तो शेठ सगळे भक्त. तिने तर विरोध हि केला होता म्हणे. अगर पाच साल मे नही आया पंधरा लाख, तो १५ साल मे भी नही आयेगा, म्हटलं होत. अन तिच्या शेठ ने कामावर काढून टाकणार अशी धमकी हि दिली होती.

रंगा- बिल्लाचे काम पंधरा लाख, पुलवामा.. दोघांनीही झाले होते.

पण हाल्फ चड्डी वरण फुल्ल चड्डी वर गेलेल्या संघाचं काम तर झालं न्हवत. संघ त्याचे प्रॉमिसेस पूर्ण तर करणारच होता. उशीर होत होता. एमरजंसी — जे एन यु आणि जामिया च्या आडे आणणार होते, नाही आली. ४८ मुस्लिमांचा खून पाडण्यात आला तरी नाही आली एमरजंसी. हताश रंगा बिल्ला ची जोडी उत्तर देऊन देऊन थकली होती संघाला. संघ नाराज होता. निमित्त कोरोना होत. बिल्ला गायब झाला. सगळी कामे एक एक पार पडायला सुरुवात झाली. सगळ्यात भयानक काम या वेळेस तर सरकारी आधार म्हणजे केंद्राची असणारी सगळी कमाई करणाऱ्या कंपन्या कॉर्पोरेट ला विकण्याचा आणि जमीनीचे कायदे, कामगारांचे कायदे आणि पैसांची रोकड्यात कॉन्व्हर्ट करण्यासाठीचे स्वतंत्रता हाती घेतलं. बदललेत. त्या दरम्यान रंगाने टाळ्या, थाळ्या, दिवे लावण्याच्या कार्याला हि लावले. देश ते करतही सुटला. लोकांनी हसण्यात घेतलं. हस्याची वर्तवणूक्या पण होत्या त्या. पण झालंय चड्ड्या वाल्यांचं काम, मस्त पैकी.

घरी जातांना लोक मरता हेत, मारले जाताहेत. फाशीवर चढता हेत. ऍक्सिडेंट ने मरता हेत. सरकार आपले सगळे पराक्रम लपविल. देशभक्तीच्या नावाखाली. गुलामी आता, दुसरं काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *