शांताबाई

शांताबाई ~ तेरा है जलवा
माहीम चा हलवा
जीवाचा कालवा
मनाला भुलवा
मामाला बोलवा
कालवा-हलवा कालवा-हलवा
यात अश्लीलता काय आहे?? अश्लीलता तर ‘त्यांच्या’ बुद्धीतच आहे. कधी Porn बंद, कधी Beef बंद, आम्ही शुद्ध शाकाहारी, माणुसकी मानता न मग प्राण्यांना का मारता म्हणणारे, प्राण्यांनी नुसता मुतल पण तर त्या प्राण्याला घरातन बाहेर काढणारे, हे अस्सल सवर्ण-ब्राह्मीन, कळत-न कळत कधी बहुजन विरोधी बनतात अंदाज नाही. संजय लोंढे तसा बहुजन नसून दलित आहे. हा प्रश्न अश्लीलतेचा मुळीच नाही. प्रश्न Structural Power चा जो ‘ते’ मागत नाहीये, तर हिसकावून घेत आहेत, घेतलेत. झोपडपट्टी च्या लोक कलावंत पट्ट्याला विनाकारण छळणार आणि त्याचीच कलाकृती ‘ते त्यांच्या’ नावावर करतील आणि मस्त Profit कमावतील. लावणीच पण तसच झालय न!! आधी ते TV वर न्हवतो तेव्हा Low Culture, अश्लील, TV वर आल आणि त्यांच्या ‘पोरी-बायका’ (Let’s talk about sexuality वाल्या) नाचायला लागल्या तेव्हा म्हणे हि कलाकृती Preserve व्हायला पाहिजे. आनंद शिंदे च गाण, ‘जेव्हा नवीन पोपट हा’ ‘चल रे लक्ष्या मुंबई ला’ मध्ये घेतलं, तेव्हा कुठे त्याच्या वरच अश्लीलतेच रडगाण कमी झाल, पण ‘चल रे लक्ष्या मुंबई ला’ माहित नसणारे अजूनही या गाण्याला अश्लीलच म्हणतात. अवधूत गुप्ते आणि अनुराधा पौडवाल मस्त उदाहरण हे या साठी. आनंद शिंदे दमदार गायक, संगीत कार असून सुद्धा त्याला आजही एका एका गाण्यासाठी फिरावं लागत. सांस्कृतिक लढा काय असू शकतो? आणि ज्या कलाकृतींना अश्लील म्हटलं गेलंय, जर पडताडून पाहिलं तर लक्ष्यात येईल. आपण पण कुठे तरी कमी पडलोच हे.

~ जयभीम
https://www.youtube.com/watch?v=IYqGOsnSCJM

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *