शिक्षण बेकडं बनवतंय, शिक्षण लाचार बनवतंय.

म्हणजे लिंबाळे ने शिक्षणाला दिलेली लोकशाहीकरणाची साथ, ढसाळांनी दिलेली व्यावहारिक वाद, जॉन ड्यू आणि बाबासाहेबांमध्ये शिक्षण म्हणजे काय? यात झालेला वाद, राज्यकारभारासंबंधीचा पायाभूत माहितीला बाबासाहेबांनी दिलेला जोर आणि या साठी लागणारी मूलभूत बांधणी कशी होईल त्यासाठीचा ड्यू चा आग्रह, सगळं सुन्न करणार आहेच. मुंबईच सिद्धार्थ, आणि औरंगाबादचं मिलिंद जेव्हा स्थापित झालं, काही का असेना ड्यू ने घातलेला वाद, बाबासाहेबांनी अमलात आणला, एक चांगला विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांनी ड्यू ला आदरांजलीच वाहिली होती. सिद्धार्थ आणि मिलिंद राज्यकारभारासंबंधी लागणारी मूलभूत माहिती एक संध बांधली ती हि राजकीय आणि सांस्कृतिक रित्या. दूरदृष्टी वेदक बाबासाहेब तेव्हा साऊथ बॉम्बे ला सिद्धार्थ बांधतात आणि औरंगाबादच महत्व जाणून मिलिंद. दलित साहित्य निर्मितीला हे दोघे संस्था महत्वाचे काम बजावतात. वेदना, पीडा, चीड, असंतोष, राग, प्रेम अशा कित्तेक प्रकारच्या भावना शब्दात उतरवताना मिलिंद आणि सिद्धार्थ कॉलेज चे विद्यार्थी करतांना दिसले, त्यानंतर मराठी साहित्य सृष्टीला एक वेगळा अनुभव आला. तदनंतर बऱ्याच घडामोडींच्या कालावधीत शिक्षणाला बेजार केलं, बाजारीकरण तर सर्रास आणि शिक्षण घेतलेला सर्रास मुजोरी करतांना पण दिसतो. शिक्षणामुळे बऱ्याच घटना एक व्यक्तीच्या जीवनात बदलत असतात. पण ‘रिटर्न बॅक द्यायची वेळ येते तेव्हा’ हा अर्ग्युमेण्ट पण हाय जॅक केलेला दिसतो. अति महत्वाचं राजकारण शिक्षणाचं लपवलच गेलं. कदाचित शिक्षण ‘रांगडी’ जीवन आणि खऱ्या-खोट्यातलं अंतर कमी करतोय, असं दिसायला लागलं. आंबेडकरी चळवळ करणारे पण सगळे शिक्षित आहेत, शिक्षित म्हटल्यावर थोड्या फार प्रमाणात नोकरी पण करतात, म्हणजे मिडल क्लास पण झालेत, म्हणायला हरकत पण नसणार कि आंबेडकरी चळवळ मिडल क्लासच राहिली. शिक्षण घेणारे, शिकून मोठे झालेले (हे मोठे होणे काय आहे याची शहानिशा पण करायची नाहीये) बेकडी जगताहेत, आणि जे शिक्षित नाहीत ते जास्त शोषित होताहेत. शिक्षण घेतलेले माझ्यासारखे शोषितांना शिकायला सांगतोय आणि त्यांना बेकडं बनवायला लावतो. कारण एकच, एक गत नेहमीच सगळ्याच ठिकाणी, शिकून मोठा हो-मोठी हो, बाबासाहेबांगत शिक, आणि सगळे शिकलेले तदनंतर स्वतःला बाबासाहेब समजतात. शिक्षण लाचार कसं बनवत, याचे उत्तम उदाहरण दलित साहित्यात चांगल्या प्रकारे दिलय. म्हणजे प्रकाश जेव्हा बौद्धवाड्यात येतो, शिकलेला आणि बँकेत नोकरी करणारा आणि शहरात राहणारा, त्याची मामाची चिंगी त्याला आवडत नाही. त्याचे शेम्बडे भावंडं किडसवानी वाटतात नि बोमिलचं कालवण जे त्याला खूप आवडायचं, ते आज त्याला नकोस झालय. हे सगळं झालं कारण प्रकाश खोटा होता, शिक्षणाने त्याला एक चांगली साथ दिली, आणि खरातांनी ते मस्त टिपलंय. काळाच्या मर्यादा ओलांडीत बुद्ध, फुले, कबीर, आंबेडकरी परंपरा मानणारा दलित शिक्षण घेऊन कुठली संस्कृती जपतोय याच उत्तर मला नाही सापडणार, माझी अवकात नाही. म्हणजे, साले ओपन कॅटेगरी, आणि ओबीसी तर शिक्षण घेऊन, न घेऊनही बेकडी आहेत कदाचित जन्मताच ते असे असतात. ‘वरचं’ ऍस्पिरेशन चुकीचं आहे तर अपेक्षा नसावी. शिक्षण हमखास बेकडं आणि लाचार बनवेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *