समर्थक

एक मूर्ती भंजनाची झुंडशाही समर्थक,
तर दुसरे अनवाणी पायी चालवून घेण्याचे समर्थक.
लाल बावटे म्हणवून मोर्चेकरी किती हि चालला,
तरी दर्देने त्याचा चेहरा किती लाल झाला;
तो चेहरा न पाहता, त्याच्या हातात लाल झेंडे-टोपी आंदणात दिलीये.
प्रतिरोधक, प्रतीकात्मक किंवा उपरोधिक
मोर्चेकरी मोर्चा करतीलच.
टेकनॉलॉजि आहे मोर्चा करणे, टूल पण म्हणू शकतात.
मुंबई करांना प्रॉब्लेम झाला तर तो काय येईल का गावाकडे?
पण प्रश्न जल-जंगल-जमिनीचा, गावात तर सत्ताधारी सोयीने काम करतात
अल्पोपहार, पाणी, बिस्कीट, चाय, सुक्कट, भाकरी साठी नाही तर
न्यायेसाठी आलेले आहेत ते.
न्यायची देवता आंधळी, तुम्ही नाही ना?
अल्पोपहार, पाणी, बिस्कीट, चाय, सुक्कट, भाकरी देऊन त्यांना पांगळे करतात.
आणि म्हणतात हम तुम्हारे साथ है.
मुंबईकर तुमचं वर्चस्व त्या गिरणी कामगारांमुळे, त्या विधानभवनामुळे, त्या सामावलेल्या संसाधनामुळे,
त्या रोजगारामुळे.
याचा अर्थ असा नाहीये कि जल-जंगल-जमीन दुय्यम.
मुंबई साठी पाणी येत कुठून
याच जनतेच्या घरासमोरून, कसलं भूशाण रे?
त्या अल्पोपहार, बिस्कीट, चाय, सुक्कट, भाकरी, पाणी पुरवण्याचा
गहाळ केला प्रश्न, पुन्हा एकदा
मुंबईकर तुझी मध्यम वर्गाची स्पिरिट पुन्हा जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *