सोनल-शीतल

33900794_2160085730945008_2937817004091899904_n

शीतल-सोनल जशा जन्मल्या तसं त्यांना माझ्या घरातले उणे-अधिक बघायला भेटले. पारंपरिक विवादांपासून घरात जुडलेले नवीन नातेसंबंध नि त्यातली व्यावहारिक आणि इमोशनल देवाण घेवाणीत यांचा मोलाचा वाटा. मग लगेच नकळत घरातले रोमँटिक पण विवादाधित प्रसंगे पण समजायला त्यांना भागी पाडलं गेलं. निष्ठावंत त्या, माझे सिगरेट-लायटर जर घरी कुणाच्या नजरेत पडत असतील, तर त्यांना लपवणे, शाबीत करतात. असे साऱ्या प्रसंगात त्यांना भाग घाव्याचं लागतो. पर्याय नसतो उरलेला त्यांना. मी लहान मामा, त्यांचा. म्हणून जास्त जवळचा. त्या दोघी बारावी पास झाल्यात. एकीला ५९ आणि दुसरीला ६o कि ६५. निरास केलं, थोडी फार कॉपी चालते म्हणून कमीत कमी ७० तरी पाहिजे होते. घरात येणारे आडे-तेढे प्रसंग सोताच्या जबाबदारीने पार करणाऱ्या. बोर होत म्हणून गवत निंदायलाही जातात. शीतल नाही जात, तिला धूर ची अलेर्गी आहे. शीतल ची कला लोकांना/लोकींना ब्युटीफाय करण्याची. नुकताच घरी गेलेलो तर बघितलं, एक मिडल एजेड तिला खुश होऊन पैसे द्यायला आली होती. हक्काचं नातं म्हणून त्या व्यक्तीला विचारलं पण होत, ‘सगळे तुला नवरी समजत होते ना’, ती हो म्हणाली होती. तिच्या ब्युटीफाय करण्याच्या प्रोसेस मध्ये मला, एकही महागडी वस्तू आढळली नाही. सगळ्यात महागडं दिसलं ते, पॉंड्स पावडर चा डब्बा. सोनल गवत निंदायला जाते, त्यात तिची कला अन याच बरोबर डान्स. गज्जब. सडे तोड बोलून जशास तसे उत्तर देणारी, तिची वर्तवणूक आहे. माझ्यानंतर घरातली सगळ्यात जास्त उद्धट. म्हणजे एवढी उद्धट कि मला नमतं घ्यावं लागतं. तबेला स्कूल मध्ये झालंय, त्यांचं Nurturing. रंकेश, सुद्धा बारावी पास झाला. अजून बरेच झालेत. यांच्या शिक्षणाच्या जबाबदारीची जाण ठेवून, तबेला स्कूल चालवणाऱ्या एक्कम एक व्यक्तीच्या कार्याला सलाम ठोकून, शीतल-सोनल-रकेश च बारावी पास च्या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *