हट्टहास तुझा

उत्कंठेला तू तुझी चेतना समझतोय.
होते का ते, उत्कंटा किंवा परमोत्कर्ष?
परमोत्कर्ष?
नसेल समझलं, जाऊ देत.
डोकं नको खाजवू.
तू परत्माभावा वरती खुश रहा.
लवड्या हेस तू, ना तुला भवताल समझला, ना तुला तू.
तुझा हट्टहास जितका बालिश, तितकीच तुझी समझ.
तुझी आहे लायकी! तुझी आहे कुवत!!
तिला तर समझ.
जास्त अपेक्षा पण नाही तुझ्याकडनं.
लोकांनीं किंमत करावी अशी हि तुझी ओळख.
त्रासलेला, ग्रासलेला, पीडित.
अशी हि तुझी परंपरा
उठवलं तुला, त्या नरकातन,
बापानं.
आता तरी उठ.
बाप न्हवता अडकलेला, तुझ्यागत.
त्याचा आदर्श घेतो ना तू.
त्याने प्रवाह बदलला आणि लढायला शिकवलं.
तू त्याची ओळख ठेवतो,
अन त्याचं जग समजण्याच्या सामुग्र्यांना तू हेपल्या मारतोयस?
हेपल.
पण काय फायदा.
तू तर मढ.
काय होणार हे तुझ्याकडनं,
ना तुला वेळ कळाला, ना तुला तुझी भौतिके कळाली.
जुलूम तुझ्या माथी मारलेला.
साधनांचा अभाव.
तंत्रज्ञानाच गर्व.
या पल्याड शब्द पण नाहीत तुझ्याकडे.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *