११ एप्रिल

मुंबईत आल्यापासून एवढे कधीच मिस न्हवत केलं. आज या लॉक डाउन मुळे एक एक गोष्ट आठवत आहेत. ११ तारखेच्या सकाळी माळीवाड्यात जाऊन तिथल्या क्रांतीबा फुले पुतळ्याजवळ अभिवादन करून गल्लीत परत यायचं तिथे थोडं फार लोकांशी बोलायचं मग आपापलं छोटं मोठं काम निपटून घरी परत यायचं. सगळ्या पोरांनी मग संध्याकाळी गोळा होऊन १३ एप्रिल चा कार्यक्रमाची झालेल्या आखणी नंतरच काम एक्सिकूट करण्याकडे जास्त लक्ष असायचं. १३ एप्रिल चा कार्यक्रम म्हणजे खालचे गाव बौद्धवाडा साठी त्या वेळेस च्या सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या शिरपूर शाखेने दिलेले एक भली मोठी देणगी होती. माझ्याकडे तेवढी काम सोपवली जायची नाहीत. आणि मला करणे आवडायचे पण नाही. पण जेव्हा जेव्हा मला काहीही सोपवलं असेल, पूर्ण केलंय. एका ११ एप्रिल ला काही माळीवाड्यातल्या पोरांनी अडवलं, सकाळच्या अभिवादनात त्यांनी आम्हाला बघितलं होत. मी आणि माझा मित्र रवी (वारला तो). अडवलं म्हणजे मारायला वगैरे नाही. प्रश्न आणि कुतुहूल होता त्यांच्या मनात. स्पष्ट म्हणायला गेले तर ‘तुम्ही महार आणि आमच्या फुलेंच्या पुतळ्याला का म्हणून हार टाकायला येतात’ असा तो कुतुहूल. जस प्रत्येक शहरा शहरात आहे, तसच काही शिरपूर मध्ये पण आहे. प्रत्येक गल्लीचा दादा आहेत आणि ते प्रत्येक कार्यक्रमावेळी फोटो काढायला आणि स्वतःची झांकी काढायला पुढे सरकावत असतात. आताहि तीच गत, त्यात भर पडली कोरोना मध्ये ते किती दानशुर आहेत दाखवण्याची. असो, तर त्या पोरांनी अडवलेले एका अर्थाने चांगलेच होते. ते पोरही आपापल्या म्होरक्यांची चापुलस्की करतच होते. पण ठीकच वाटलं होत कि त्यांनी विचारलं. मी आणि रवी व्यवस्थित त्यांना समजावत होतो. जेवढा कळलेला क्रांतीबा होता तेवढा पुढे सांगत होतो. सत्यशोधक समाजापासून तर दृष्ट वामनाला, याची गांड का नाही फाटली असे लिहणारे फुले हि सांगत होतो. क्रांतीबा कसे पहिले शिवचरित्रकार होते ते हि सांगितले. काही पोर तर जास्त खुश म्हणजे डायरेक्ट कनेक्शन आहे शिवाजीसोबत आपलं असं ते म्हणत होते. ब्रम्हाला बेटीचोद म्हणून रुपकीय भाषेत बोलणारे; त्यातल्या त्यात हंटर कमिशन समोरच त्यांचं भाषण हि सांगितलं. संभाजी राजांना औरंगजेब पेक्षा बामणांनी कशाप्रकारे छळ केला हे लिहणारे हि क्रांतिबाच होते हे सांगत असतांना एक पोरगं तर बामनांना शिव्याच (ब्राह्मणेतर चळवळ :D) द्यायला लागला. त्यांच्यातले काही कॉलेजात होते सोबत. खूप बरं वाटलं होत त्या दिवशी. कॉलेज मध्ये २८ नोव्हेंबर ला शिक्षक दिन साजरा करण्याचा नावाखाली प्रत्येक वर्ग वर्गात जाऊन त्यांना फुकटचा डोस हि द्यायचोत कि ५ सप्टेंबर च राजकारण काय हे म्हणून. त्या अडवलेल्या पोरांचं नेमकं काय चाललंय माहित नाही पण शिरपूर मध्ये क्रांतीबाच्या जयंतीचा दिवशी कार्यक्रम, पहिल्यांदा बौद्धवाड्यात झाला होता याच सुख जमा हे मनात. त्याच्या अगोदर क्रांतीबा फुले जयंतीचा थांगपत्ता हि न्हवता शिरपूर मध्ये. सयुंक्त जयंती उत्सव साजरा करणारे पण बौद्धवाड्यातलेच लोक होते, म्हणजे खालचा आणि वरचे दोघही. मुंबईला येऊन या सगळ्या हॅबिट्स ची घुसरघुंडी झाली. मुंबईत येऊन मग वरळीच्या छेडयात नाही तर चेंबूरचे आंबेडकर गार्डन… जास्तच झालं तर पांजरापोळच्या मिरवणीकुत जाऊन नाचायचं. रमाबाईत फेरफटका त्याच्यात कधी कधी… बस. लिहिता लिहिता अजून एक आठवलं टिस च्या पहिल्या दुसऱ्या वर्षी काही शेरिंग सेशन्स मध्ये पुण्यातले काही थोड्या थोडया गोष्टीत फुगून बसणारे फर्ग्युसन कल्लोड तर सावित्री फुल्यांची जयंती का म्हणून साजरा नाही करायचेत शिक्षक दिवस म्हणून असा रेव्होल्यूशनरी प्रश्न हि केलेला. ते हि असो. अशेही लिबरल्स पाहिजेच असतात.

सगळ्यांना क्रांतीबा फुले जयंती आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा.

घरीच रहा. फेसबुक लाईव्ह मधून प्रबोधन करा. गाणी म्हणा आणि ती पोस्ट करा. एवढे दिवस काढलेत अजून ३-४ दिवस काढून घ्या. स्टे सेफ. अँड बी काल्म.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *