Randoms

Story: 1

सरंजामी भांडवलाचा फायदा उचलत ते बदल करायचा आहे ची भावना करीत, जाती व्यवस्था समजायला सुरुवात केलेली. घरातली कितीही शोषित अवस्था असेल, तिला हाताडायला हे हतबल. पण वाचन वगैरे चांगलं म्हणून कुणाला बोलू देतील याची ग्वाही कोणी देऊ शकत नाही. यांच्याकडे नेहमीच जास्त बोलायला मग फरक काय तर यांच्या बोलण्यातून कामा व्यतिरिक्त निष्कर्ष जास्त. यांची विचारांची पातळी हमखास इतरां पेक्षा जास्त हि असेल. हे वावरतांना निराधार झाले आहेत असे दाखवतात, यांच्या वावरण्यात एक घमंड, कि ते वाचन करून लोकांना बदलण्यास ‘प्रवूत्त’ करतात. यांचे विचार, भावना आणि संवेदना हि पराकोटीला पोचलेली, काहीही झालं, यांना आधी फरक पडतो. पण वास्तव असं कि यांना घंटा काही फरक पडत नाही. यांच्यासाठी तर डिस्कशन महत्वाचं. पळवाटा यांच्या धमन्यातनं वाहत असत म्हणून हे कधीही पळ काढतात. बेभान अवस्थेत देखील यांना इतरां वरती गालबोट लावायचं आहे. प्रखर टीका यांच्या मनी लागते म्हणून ते बरेच सैरबैर झालेले असतात. यांचा कुठलाही नॅरेटिव्ह हा जगाला उदाहरण असते अशी यांची समजूत. यांना कुठल्याही प्रकारच्या इडिओलॉजि ची गरज नाही, सिनिकल पण हे स्वतः ला पोस्ट मॉडर्न हि मानत नाही. पण सरंजामी भांडवल काय आहे, हे यांना टाळायचंय. ते दाखवून द्यायचच नाही. शेवटी एकच जो कोणी सरंजामी भांडवली अवस्थेतनं फायदा घेत असतात, ते स्वतःवर जास्त केंद्रित असतात. काय त ते डी-कास्ट, डी-क्लास झालेले हे यांना इतरांचं काही घेणं देणं नसत. इतरांचं USE कस करता येईल याच संशोधन ते चांगल्या रीतीने करतात.

Story: 2

जातीय-वर्गीय अरिष्टांना ती तोंड देत, शहराकडे वळली. गावाकडच्या त्रासाला न जुमानत, ती आपल्या नवऱ्या बरोबर पूलच्या खाली कसे बसे दिवस काढत होती. तिला वाटलं होत कि, शहराकडे बरीच खुशाली असते, पण दोन वेळच पोट भरण्याशिवाय इथे कसलीच खुशाली तिला दिसली नाही. काही दिवसातच तिचा नवरा दारू डोसलायला लागला. शहरातली चमचमाट यांच्या पासून कोसो लांबच राहिली होती. मग हिने पण निच्चय केला कि जो पर्यंत ठोस उत्तर नाही तो पर्यंत अपेक्षा नाही. मध्यंतरी काही सोसिअल वोर्कर तिच्याकडे येऊन गेले होते, ती त्यांची मदत घेत आपली जीवनमान सुधारण्याचा प्रयत्नात होती. परत गावाकडे त्या जातीय-वर्गीय परिस्तिथीला सामोरे जाण्यापेक्षा शहरातल्या भयाण अशा वास्तवास सामोरे जावे, असे तिला मनातनं वाटायचे. आज झालीत तिला सात वर्षे – तिच्या निच्चयामुळे तिने बरेच काही कमवले होते. एवढी समजदार कि तिने बाळ जो पर्यंत खुशाली येत नाही तो पर्यंत नाही होऊ द्यायचाचा निर्णय घेतला. नवरा तिचा कोपरखैरणे तल्या एका बाटली कंपनीत आहे. आणि जास्त पीत नाही, occassionally घेत असतो. तिची सासू कधीच वारली होती म्हणून सासू चा त्रास तिला माहित नाही. तिचे आई बाबाला पण कोसो गरिबी म्हणून तिथनं काही अपेक्षा ती ठेवत नाही. भाजप चा नवीन नियम आला – तिच्या भाजीपाल्याचा दुकान अतिक्रमित आहे म्हणून तोडलं गेलं. खचली नाही. तिने डोक्यावर भाजी पाला घेतला आणि विकायला सुरुवात केली. शहरातली भरमसाठ उकचवर्गीय जीवनाचा तिला स्पर्श पण नाही झाला होता, पण एक सुख तिला शहरात होते, तिच्यावर पुरुषांचा कंट्रोल ज्याप्रमाणे गावी होता, त्याप्रमाणे शहरात न्हवता. तिच्या संसाराच्या गाडीला काही टोमणे मध्यन्तरी लागलेत. ती सावरली त्यातनं. तिचा नवरा आज घडीला कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करत असतांनाच युनियन मध्ये काम करायला लागला. जीवाची साथ त्या दोघांची झाली. सोसिअल वर्कर पण तिला बऱ्याच रित्या मदत करीत होत्या. गांधीगिरी का असेना सांगत होत्या. ती भक्कम. नाही बळी पडली मोहमायात. शहरच दगदगीचा जबळयात जीव ओतावा असं काय आहे या जातीय-वर्गीय अरिष्टांमध्ये तिला कळून चुकलं होत. जातीने चांभार ती पण तिने जातीने दिलेले काम न स्वीकारता शहरातले इन्फॉर्मल सेक्टर मधल्या वेगवेगळे कामे केलीत. ती म्हणते – मी शिकली नाही पण शहराकडे चला, म्हणजे वेगळं जीवन जगा. कष्ट करा.

Story: 3

गल्लीतल्या भांडणात वाचला म्हणून त्याच्या आईने त्याला गावी शिकायला पाठवलं. बाप न्हवता म्हणून आईनेच त्याचा सांभाळ केला. त्याच्या आई बापाने लव्ह म्यॅरेज केलं होत म्हणून बरेच वर्षे झाली होती तरी दोघ कडचे त्यांना बोलायला तयार नाही. त्याच्या आईची आई, कुठे तरी बोलायला सुरुवात केली म्हणून त्याचे मामा त्याच्या आज्जीलाच बोलणं बंद केलं होत. गावी त्याच मन लागत नाहीये हे गल्लीतल्या पोरांना कळून चुकलं होत. बॉम्बेतला म्हणून याचेही नखरे जास्त होते, पण न चुकता तो आजीचं ऐकायला लागला होता. शाळेत घातलं, तेव्हा तो आठवीत होता, कशी बशी आठवी पास केली आणि तो परत बॉम्बे ला आला. आई पण काही बोलली नाही पण तिला थोडं जड जाणार होत, घर सांभाळणे. पोरगा गावातल्या पोरांमध्ये राहून व्यावहारिक झालेला. शाळेत जाता जाता तो पेपर टाकण्याचा कामाला लागला. त्याच्या बापाने सूर लावून ठेवलेला म्हणून त्याच्या आई ने पण परत डिस्टन्स कोर्से करायला सुरुवात केली. याच हि ग्र्याड्यूएशन संपत आलं, आणि तीच हि. दोघांनी बऱ्यापैकी घरातला रेटा संपवला. दोघे हि कमावत होते. पोरगा व त्याची आई आज्जोड्डी जात असतात. पोरगा तिथल्या पोरांना काही ना काही घेऊन जात असतो. बरं, पोरगाचा पेपर टाकण्याचा धंदा पुस्तकाचं दुकानच झालेलं. बऱ्यापैकी कमाई होत होती. पोरगा, ३५ वर्षाचा झाला आहे आणि परिवारासाठी मोठं घर घ्यायचाय म्हणून पनवेल ला शिफ्ट होण्याचा प्रयत्नात आहेत.

Story: 5

*काही दिवसापूर्वी पनवेल ला भेटलेले हे दादा

याला गिल्ट होती कि तो शिकला नाही म्हणून. आजूबाजूला असलेल्या शिकलेल्यांनी शायनिंग मारायला सुरुवात केलेली आणि थोबाडं पुढं करत निर्लज्जम सदासुखीच ध्यास घेतलेला होता, पण या भावड्या ला त्याच कौतुक. कौतुक खातर का असेना त्याने यशवंतराव ला ऍडमिशन घेतलं. पास झाला. असं हि यशवंतराव ला पास होणे म्हणजे, घरी बसून पेजेस भरणे, तो आरामाने करायचा. त्याने MA ला ऍडमिशन रेगुलर मध्ये घेतलं. मग त्याने हि शायनिंग जवळून बघितली. वस्तुस्थिती अशी होती कि भावड्या त्यांच्याशी मिसळायला लागला होता. मगाशी तो त्यांचे रेफेरेंन्सस घरात द्यायला लागला होता.

Story: 6

घरातील बऱ्याच गोष्टी आता त्याला किळसवाणी वाटत होत्या. बापाकडे तो गाडी मागत होता आणि आईला तो स्वप्न दाखवत होता. लहान्याने तो पर्यंत चळवळीचे काम चालू केलेली म्हणून त्याला भावड्या नावडता झाला. आई ला वाटायला लागलं कि लहान्याने चळवळ सोडून भावड्या सारखं, Ambitious व्हायला पाहिजे. आणि लहान नेहमी प्रमाणे विरोध करत, बाबासाहेबांची पुस्तक विकत घेऊन घरात गोळा करायला लागला आणि टोमणे खातर म्हणत सुटायचा, ‘बर झालं, मी शिकत नाहीये, बाबासाहेबाला शिकलेल्यांनी धोखा दिला’. लहान्या आज हि चळवळीचं काम करतोय आणि पोटाची खडगी भरण्यासाठी पिढ्यान पिढ्या आलेलं कामाला ठोकर मारीत, कलर कामाची काँट्रॅक्टस घेतोय.

दलित साहित्यीक्यांकडे असे काही होते कि त्यांनी प्रमाणशास्त्राला भीक न घालता, साहित्यशास्त्राला भीक न घालता स्वतःचा साहित्य विचार विकसित करायला सुरुवात केली?

Argument: 1

मुळात हा प्रश्न असा विचारायला पाहिजे कि मराठी साहित्यात असे काय होते की दलित साहित्येकांना मराठी साहित्यापासून फारकत घ्यायला लागली. ‘संस्कृत आणि इंग्रजी साहित्यतातून एवढी कॉपी मराठी साहित्याने केली कि ती पडछाया अधिक वाटते’, असं लिंबाळे पण म्हणतात. जे साहित्य पडछाया त्या साहित्यात वर्ण आणि वर्गातल्या सगळ्याच खालच्या थरातील साहित्यिकाला स्थान हमखास नसणार अशी खुद्द ग्वाही या खालच्या थरातील लोकांनी जेव्हा बाबासाहेबांचा कार्याचा गौरव केला त्यावेळेस दिसूनही आलं. मग बाबासाहेबांचा गौरव, वाद येणारच. म्हणून तर काय ‘दलित साहित्य’ वादग्रस्त आहे असं म्हटलं जातं. दलित साहित्याच्या निर्मितीला बरेच कारणे आहेत. चीड, वेदना आणि संताप यांच्याखेरीज महत्वाचं कारण म्हणजे उत्तम लिखाण. या उत्तम लिखाणात कुठल्याच प्रकारचे मापदंड आणि साहित्यशास्त्र नाही. खरं तर दलित साहित्याने मराठी साहित्याला वाचवलं आहे, असं मी मानतो. नाही तर कोणी हुंगत न्हवत, हि पण वस्तुस्थिती आहे. पोळ्या भाजणारे उच्चवर्गीय आणि उच्चवर्णीय साहित्यिक हे शिक्षणाच्या लोकशाहीकरणातून नाही आलेत तर त्यांना जे काही प्रिव्हिलेज भेटला त्याला मूल्य मानून मोठे झालेले आहेत, असं म्हणायला मी कुणाला घाबरत हि नाही. साहित्याशी सामाजिक जाण दलित साहित्याने बांधून दिलीये. कुठे ते ‘हिरवे हिरवे गार गालिचे’ आणि कुठे ‘स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचे नाव आहे’? काही समानता दिसते का?

Story : 7

शिकून मोठा होइन, असं सांगत तो घरातनं बाहेर पडला होता तो, काही वर्षांपूर्वी. आता त्याला घर वाल्यांशी बोलायला लाज वाटते. म्हणून फोन पण नाही आहे त्याच्याकडे. तो म्हणत होता, आई लाल दिव्याच्या गाडीची वाट पाहत आहे आणि बाप महागडी दारू मागतो. याच्या मित्रांना हा कूल वाटतो आणि हा चांगला बोलतो म्हणून पोरी याच्या जवळचे आहेत. त्याचा result लागला पण हातात काम नाहीये. त्याच्या डोळ्यासमोर आईचे स्वप्न आणि बापाची हौस होती. झिंदगीला शिवी घालीत तो म्हणाला, धिक्कार आहे शिक्षण प्रणालीचा. मी म्हटलं, शिवी बनवं नि लोकांना फॉरवर्ड कर. स्वागत आहे तुझं इन्फॉर्मल सेक्टर मध्ये.

टीप – सेक्टर आहे म्हणून कितवा विचारू नये.

Story: 8

पदवीच्या वर्गात शिकणारा, भल्या मोठ्या गोष्टी न करता, कामाबाबतीत थोडा अनुकूल आणि हाताला मिळेल ते काम करीत, लायन मारण्याचा धंदा त्याचा चांगला चाललेला. कोणी मित्र सवंगडी नाही का कोणी असं मोकळीक देणारा जवळचा दोस्त यार करवून घेतलेला. कॉलेज, तिथले भन्नाट जगणं, मोठी बिल्डिंग, त्या नवख्या, सुंदर दिसणाऱ्या गोऱ्या चमडीच्या पोरीत हा पोरगा कधी स्वतःला विसरला कळलं नाही. पदवी संपली, तशा जो दिसणारा बहर कमी कमी व्हायला लागला आणि याला दोस्त यार मित्र सवंगडीची गरज भासायला लागली. गल्लीचे पोर तसे चांगले, त्यांनी समजून घेतले. जवळ केले. गल्लीत राहणार एक ऍस्पिरेड शिक्षक पण बाबासाहेब वाचणारा पोराने याला बऱ्याच गोष्टी सांगायला सुरुवात केली. पोरगा बोलका झाला. त्याने काम करायला सुरुवात केली, आणि काही अर्थाने चळवळीची काम करायला सुरुवात केली. याच्याकडे परत अजून बहर आला. पोरगा खुश झाला, पोरगा चळवळ्या झाला, दोस्ती यारी पण छान झाली. त्याला कळून चुकलं कि एकटं राहण्यात मजा नाहीये. पोरगा जेव्हा पदवीत होता, गर्वात होता. ऍस्पिरेड शिक्षक त्याला रोजच बघायचा आणि चांगली वेळ येईल अशी आशा बाळगून होता. चान्स आला ऍस्पिरेड शिक्षक ने डान्स केला. पोरगा असंघटित कामगारांत मोडला जातोय, पण बहार आजूबाजूला बराच आहे.
टीप – हि माझी स्टोरी नाहीये.

Argument: 2

जेवढी विटंबना बाबासाहेबांची झाली आहे या देशात तेवढी कोणाची झाली नाही. होणार हि नाही. बाबासाहेबाला बापाचा माल हा ‘समज’ दूषित आहे आणि असं म्हणणेही चुकीचे आहे कि ते सगळ्यांचे. तीच गत फुल्यांची, पण त्या प्रमाणावर नाही. फुल्यांना बाबासाहेबांनी गुरु म्हटले आणि फुले ग्रंथ दिसायला लागलेत. हि अवस्था इथली. बाबासाहेबांना दोषी म्हणणारे सगळेच चुकीचे आहेत असे मी म्हणणार नाही. पण हे स्वतःची जात कधी सांगत नाही कोणाला, आणि कोणी guess केला तर दात खिदडुन हसणारे हे, पण बाबासाहेबांची जात वाल्यांना टार्गेट करून करून डिवचणारे पण हेच. बाबासाहेबांना दोषी म्हणणारे हे नुकसान करीतच असतात. यांना बाबासाहेबवादी व्हायचा डर कारण बाबासाहेबवादी झालेत कि मग जबाबदारी येते, यांना जबाबदारी नकोय. हट्ट नाहीये कि बाबासाहेबवादी व्हायलाच पाहिजे असं, पण जबाबदारी कधी ओळखणार? बाबासाहेबांना दोषी म्हणणारे एका साईड ला आणि बाबासाहेबाला आपल्या घराच्या कोपऱ्यात फोटो लावून बाबासाहेब बापाची मालकी म्हणणारे एका साईड ला. मग हे पण काय करतात तर बाबासाहेबांवर कोणी टीका केली नाही केली यांचा तोल जातो आणि सावरता यांना जमत नाही. हे पण तेवढेच अजबाबदार. टीका करणे एक फंकशन आहे, ते गरजेचे असते, नाही तर उर्मी येते. टीका होऊ द्यायला पाहिजे. बाबासाहेबांना दोषी मानणारे हे टीका नाही करत बाबासाहेबांवर, तर हे बाबासाहेब मानणाऱ्यांना डिवचत असतात. हि तीच वृत्ती आहे जी बामणांनीं यांना आंदणात दिलीये. सोयीनुसार जागा बदलणारे हे, कधीच जबाबदारी घेत नसतात.

 

Review: 1

‘Who’s singing over there’ is one of the sensitive movie I ever enjoyed. It’s polite satire on the ‘reasons of war’. The movie does not lose its contact with audience/readers, and its constant communication through sub text that is behaviours of characters played by the actors; deploys the vision on audience/readers. The peculiar form of screen does not reveal only the affect of ‘reasonings’ but the tremendous informal economy of that time. And celebrates the era of decade 80. In that also ‘Who’s singing over there’ successfully dictates in form celebration. It dictates political consciousness which begins the game, suffocation and humiliation stands second and impacts learning and the use of technology later in third position complicates the understanding.

Review: 2

Noise is book written by Attali. Yogesh has given me a copy, online. It has foreword by Fredric Jameson, one of the important philosopher. The book covers the matter of listening, sacrificing, representing, repeating and composing of a song. It differentiate the major component of music that is silence. Everything has problems, so does music. However, it presents very special problems in the respect of other problems. ‘Music is not the thing which absolutely unrelated mean to other forms and levels of social life, it would seem to have the strongest affinities with that most abstract of all social realities, economics, with which it shares peculiar ultimate object which is number’. (Jameson in forward) ‘Numbers here means the music is count rerefied, abstract and specialised of all superstructural activities’, he clears. Music is an intense instability of power of our society, many processions, many camps and complicated relations with the song for rumbling. Attali writes, ‘around the rumble of day to day labourers, a strange dance, boisterous child’s play by the door to door and cortage of penitents mark the significant figures of a secret dynamic – that of music and powers’.

As if now, we covered euphenium and saxophone very little but in the processes of going to touch the hardest task the secret dynamic of bombay and music of dynamisation gives powers also. In that, cinema covers each shitt which had happened; the meaningless dialogue. Yes, curiosity of producing visual of instrument and just covering narrative around it, gives me sukoon and orgasm.

Interested people can see – https://shivathorat.wordpress.com/2018/04/12/euphonium/

Argument: 3

The critical effort in Indian scenario is dissolving into the traditional and consumeristic conservativeness. Our education system just asks us (commoner) labour. In return, we commoner getting helplessness instead of any kind of advantage. Branches of knowledge and philosophy are real but the dissemination in a critical way stopped long back. There is no healthy criticism happens in society. Left-right-Ambedkarites also doesn’t have inclusivity for the ‘functions of criticism’.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *