t-shirt आधुनिकता आणि स्तोम माजवण्याच राजकारण, थोडक्यात.

t-shirts वरती फोटो असणे हे आधुनिक असण्याचं लक्षण म्हटले जाते. त्यात वेगवेगळ्या लोकांची मते आणि  विधानं छापून येणे सुद्धा आधुनिकताच आहे, असहि म्हटलं जात. असले t-shirts घालणे, शक्यतोवर महाविद्यालयीन गोतावळा मध्ये जास्त आहे. गावा-खेड्यात अन शैक्षणिक शिक्षण न घेणाऱ्या जनतेकडे कमी असत. असही म्हटलं जात कि, शिक्षणाद्वारे आधुनिकता येत असते, आधुनिकतेचे लक्षणं आणि आधुनिकतेचा मार्ग हा भांडवली होत आहे. पश्चिमात्य देशात आधुनिकता हि वर्तवणूक आणि fashion याद्वारेच आहे. बऱ्याच गोष्टी आणि समज याला धरूनच समोर येताना दिसतो. अंद्रू रॉस, अमेरिकन प्रोफेसर याला ‘Americanization’  (अमेरिका काय आहे? सांगणे गरजेचे वाटत नाही) म्हणतो. महापुरुषांचे विधानं, त्यांचे फोटो आणि भांडवलधारी व्यवस्थेचे मिसळवणूक कशी होत आहे आणि त्यातन सध्या घडणारी जी नवीन (?) पिडी यातन काय घेतंय तो वादाचा पण मुद्दा आहे. पण t-shirts वरती फोटो, विधानं आणि मत छापून येणे यात भांडवली व्यवस्था स्पष्टपणे गोतावळ्यावरती वर्चस्व गाजवेल, गाजवतेय. या सगळ्या आधुनिकतेला हेबरमास एक अपूर्ण प्रोजेक्ट म्हणतो.

माल्कम x एकदा म्हटला होता, ‘कुठल्याही तत्वाला प्रतीकांची (symbols) गरज असते. ती फक्त गरज उरत नाही, तर ओळख बनते, अन ओळखी भांडवली व्यवस्थेला धक्का देत असतात. न कि व्यवस्था भक्कम करण्यासाठी भर देतात’. या अहुलीयाचच फोटो t-shirts वर छापून भांडवलजाद्यांनी माल्कम x नावाचं भांडवल केल.

शिवाजी राजेंनी साक्त राजेपनाचा दावा केला, ब्राम्ह्ण्यांनी त्याला धावणीला बांधलय, जस बैलाला बांधतात तस. आज शिवाजी ‘गो-ब्राम्हण प्रतिपालक असून’, त्याच्या नावे कत्तली चालल्या आहेत. शिवाजी राजेंचा फोटोसोबत t-shirts वर जगदंब, स्वराज्य, होय मी हिंदूच, क्षत्रिय अन वाघाचे पिले असे बरेच काही लिहिलेले दिसते. शिवाजी मराठ्याची जात असहि कधी कधी लिहलेले दिसून येते. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, अशाही काही वल्गना आढळून येत असतात. त्याचा बाजार असतो. भांडवलहि असतेच.

बाबासाहेबांची जयंती त्यांच्या जिवंतपणी काढण्यात आली, त्यांनी या गोष्टीला विरोधही केला, पण आम्ही कसे चांगले अनुयायी आहोत दाखवणे पात्रतेचा भाग बनतो, तेव्हाही बनला. सिद्धार्थ ने मूर्तीपूजा व्हायला नको याकडे ‘जातीने’ लक्ष देवून, अनुयायी घडवलेत. आनंद ने अनुयायी पणाची कास न सोडता बुद्ध धम्म पोचावाण्यासाठीचा जो काबाडकष्ट आहे, वाखणण्याजोगे आहे. पण सिद्धार्थ आज काय आहे? पुतडा अन विहार.

तुकारामाची गाथा जेव्हा बुडवली, कुणी इंद्रायणी नव्हती आली; ती गाथा वाचवण्यासाठी एक कोळी धावून आला, त्या कोळ्याने ती बाहेर काढून ‘preserve’ केली, जर शंका असेल तर ‘क्रांतीबाचा’ शिवाजी वाचा. पण आज ग्यानबा-तुकाराम, विठू-रुखमाई अन पंढरपूर पुरता मर्यादित तुका दिसतो. जत्रेच भांडवल तर आहेच, गाथेचा फोटो हि आहे, t-shirts वरती.

लोकांमध्ये राम किवा अजून इतर भगवानांची t-shirts घालण्याची पण सवय आहे, पण राम आणि इतर भगवान वाले तेच म्हणत आहे कि, विचार न करता घालून बैलांसारखे मान हलवणे. संभाजी भगत चं गान आठवत, ‘सिलिकॉन कि व्याली मे भाई, सियाराम का मार्केट है भाई’.

आताचा काळ हा उत्तरो-आधुनिक (post-modernists) आहे, त्यात वेगवेगळ्या सांस्कृतिक अर्थव्यवस्था हेतू पुरस्सर पसरत असून त्यात त्यांचे विशिष्ट प्रायोजने, जे अविकसित देशांसाठी घातक, आणि उद्देशांपासून दूर खेचणे वाटते, मला तरी. भारतातलं त्यातही त्यात महाराष्ट्रंच उदाहरणं हे जिवंत असायला पाहिजे, बाबासाहेब, शिवाजी, संत तुकाराम आणि माल्कम x ला हेतूपुरस्पर उत्तरो-आधुनिकतेच्या नावाखाली घातलं जात.

पण मला वरील सगळं ‘अकारण स्तोम माजावण्या’ व्यतिरिक्त काहीच वाटत नाही. ब्राम्हणाच आणि भांडवलदाऱ्याच एक रूप जे मला समजलंय; ते कुठलीही गोष्ट आधी निर्माण करतात, ती कितीही वाईटातली वाईट काहून असेना तिचा खप वाढावा म्हणून लोकांना ‘लावून देतात’. लोक बिच्चारे अंध आणि वरून श्रद्धाळू, मागचा पुढचा विचार न करता त्याच गोष्टीची चर्चा-debate-सेमिनार-conference-जाहिराती-tvप्रोग्राम-radioप्रोग्राम-प्रिंट प्रसारमाध्यमान द्वारे वाईटातली वाईट गोष्ट  बहुजनांपर्यंत (mass) पोचवतात. बहुजन हि विचार न करता (विवेकच चोरीला गेला आहे, विचार कुटून करणार) ती वाईटातली वाईट गोष्ट आपल म्हणून घेतात. आधुनिकतेच्या नावाखाली चंगळवाद-बाजारवाद ज्याला म्हणता येईल, तो बहुजन फोफावत असतात, आणि ‘विचारही विकले जातात’ याची ग्वाही विश्वासाने देत असतात. ‘Western modes of modernity’ भारतातल्या जातिव्यवस्थेत मिसळली. अस म्हणता येईल कि आधुनिकता हि t-shirts द्वारे आहे, ना कि विचार, शिक्षण आणि मतांद्वारे.

सूचना – माझ्याकडेही एक ‘rastafari’ च t-shirt आहे, म्हणून मी कोणी या सगळ्या गोष्टी समजलेला गुणी मुलगा नाही.

2 thoughts on “t-shirt आधुनिकता आणि स्तोम माजवण्याच राजकारण, थोडक्यात.

  1. Precisely, thoughts are deep rooted or not can be only check by practice.
    No, progressive practice is occurring around except modernisation in the name of cloths. Wearing T- sharts is just part of that.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *